खानोलीत “ती” ठरली आकर्षणाचा विषय..

 

 

वैभव खानोलकर l खानोली :खानोली गावचा महाशिवरात्रोत्सव संपन्न झाला मंदिराच्या आकर्षक रोषणाई इतकाच महत्त्वाचा विषय ठरला तो वेंगुर्ला आगाराची विठाई हि बस.

राज्य परिवहन महामंडळाच्या एस.टी. बस म्हणजे ग्रामीण भागातील सर्व सामान्य लोकाची जिवन वाहिनी ..

एसटी ने दुष्काळ पडला असता महाराष्ट्र केवळ 15 पैशाच्या अधिभारावर वाचवला ती एसटी म्हणजे सर्व सामान्य माणसाला हक्काची आपली वाटणारी गाडी.

लाल माती तुन वाट काढत ऊन पाऊस थंडी वारा सोसत अनेक चढ उतार, स्थित्यंतरे अनुभव आज अनेक संकटांवर मात करत एसटी सेवा देताना दिसते.

राज्य परिवहन महामंडळाच्या अनेक बस गावा गावात प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेऊन धावताना दिसतात.

खाजगीकरण आणि सरकारी चुकीची धोरणे, राजकीय लोकांच्या हलगर्जीपणा, वेळकाढूपणा,ना कर्तेपणा आणि अनेक चुकीचे नियम या सगळ्या मुळे एसटी आज तोट्यात नसताना हि तोट्यात दाखवण्याची धडपड आज हि लाल परीच्या दुरावस्थेसाठी कारणीभूत ठरतं आहे.

अर्थात या सत्तेची नशा डोक्यात गेलेले पुढारी जेवढे या गोष्टीला कारणीभूत आहेत तितकेच परिवहन महामंडळाचे वरिष्ठ पातळीवर एसटी चे अधिकारी हे या पापाचे धनी आहेत त्या शिवाय मनापासून काम न करता केवळ ड्युटी बजावणारे कामचुकार कर्मचारी हि याला काही अंशी जबाबदार आहेत.

पण एका बाजूने एसटी संपवण्यासाठी प्रयत्न पण दुसऱ्या बाजूला काही एसटी वर आपल्या स्वतःच्या वाहनांना पेक्षा जास्त प्रेम करणारे एसटी चा चाहता वर्ग आहे

आणि त्यामुळे एसटीला मानणारा एक वेगळा चाहता वर्ग हि आज गावा गावात पहायला मिळतो.

केवळ चाहता नाही तर एसटी साठी काय पण! हि मनोवृत्ती त्यांच्यात असते आणि मग स्वतःचे पैसे देऊन एसटी सजवण्या कडे असणारा या एसटी प्रेमींना कल समाजा साठी आकर्षणाचा विषय बनतो.

असाच खानोलीच्या महाशिवरात्रीला अनेकांना आकर्षणाचा आणि सेल्फी पाॅईटचा विषय ठरला तो या जत्रेत धावणारी वेंगुर्ला आगाराची विठाई बस.

गाडीच्या समोरच्या दर्शनी भागावर मांगल्याचे प्रतिक असणारी समई,आणि आकर्षक रोषणाई हि अनेकांना सुखावणारी ठरली त्या शिवाय या एसटी बस मध्ये फुगे, हिरवं मॅट आदी गोष्टीं सोबत दीर्घ काळ वाजणारा हाॅन हा सुद्धा तरूणाईचा एजाॅयचा विषय ठरला.

सजावट करून धावणाऱ्या या बसची क्रेझ अनेकांना भुलविण्याचे काम करत होती.

अर्थात या सगळ्या मागे सोहम सावंत अक्षय येसाजी या सोबतच वाहक गौरेश राणे आणि चालक वसंत नलावडे याचा सहभाग होता विशेष म्हणजे लांब पल्ल्याला धावणारी हि गाडी वेंगुर्ला आगाराचे आगार प्रमुख कुंभार साहेब यांनी या जत्रेत उपलब्ध करून देत एका उत्तम प्रशासक म्हणून कसे काम करावे याचा आदर्श समाजापुढे ठेवला.

या सजावटीत मुख्य हातभार लावला तो सोहम सावंत आणि अक्षय येसाजी यांनी.

खानोलीच्या महाशिवरात्रोत्सवात ती एसटी ज्या प्रकारे सजावट करून प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज करून हि बस धावत होती.त्यामुळे अनेकांना ती आकर्षणाचा विषय बनली..