शिरगाव येथे शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान’ समाधान शिबिर

शिरगाव (प्रतिनिधी) :      महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत देवगड तहसील कार्यालयाच्या वतीने शनिवार, ७ मार्च रोजी शिरगाव येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात प्रलंबित फेरफार, जातीचे व उत्पन्नाचे दाखले, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, अकृषिक (एनए) परवानगी तसेच विविध सामाजिक योजनांचा लाभ अशा एकूण १४ महत्त्वाच्या सेवा तत्काळ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

    शिरगांव परिसरातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल प्रशासनाने केले आहे.