तर सावंतवाडी माऊली संघाला उपविजेतेपद
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय भंडारी चषक क्रिकेट स्पर्धेतील रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात सावंतवाडी ( माऊली तिरोडा ) संघाला पराभूत करत दक्ष फायटर वेंगुर्ला संघ विजेता ठरला. तर सावंतवाडी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
रविवारी स्पर्धेचा अंतिम सामना दक्ष फायटर वेंगुर्ला सावंतवाडी संघात झाला. अंतिम सामना पाच षटकांचा घेण्यात आला. वेंगुर्ले संघाने पाच षटकात ८ गडी बाद ३९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना सावंतवाडी संघ केवळ ८ गडी बाद २५ धावाच करू शकला. त्यामुळे त्यांचा तब्बल १४ धावांनी पराभव झाला.
विजेत्या संघाला भंडारी चषक व २५ हजार रुपये रोख पारितोषिक तर उपविजेत्या सावंतवाडी संघाला भंडारी चषक व रोख १५ हजार पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. तालुका स्तरावरील विजेत्या व उपविजेत्या संघाला ही यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हास्तरीय स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गौरेश कांबळी( दक्ष फायटर संघ), उत्कृष्ट फलंदाज ओमकार (सावंतवाडी चॅम्पियन), अंतिम सामान्यातील सामनावीर गौरेश कांबळी ( दक्ष फायटर संघ) तर मालिकावीर वसंत ( सावंतवाडी संघ ) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेचे समालोचन प्रवीण ठाकुर, प्रवीण मांजरेकर, बाबली गवंडे व विद्याधर आडारकर यांनी केले. गुणलेखक म्हणून नीतेश गोळवणकर तर पंच म्हणून अरुण घाडी व नीलेश वर्णेकर यांनी काम पाहिले.
दरम्यान, रविवारी सामन्या दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी सावंतवाडी तालुका भंडारी मंडळाचे प्रसाद अरविंदेकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी माजी शिक्षण सभापती तथा माझी जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, बाळू साळगावकर, संतोष वैज, ज्ञानदीप राऊळ, नंदकिशोर कोंडये, हनुमंत पेडणेकर, नंदकिशोर गांवकर,बाळा आकेरकर, देविदास आडारकर, राजेंद्र बिर्जे, ॲड. अशोक पेडणेकर, नामदेव साटेलकर, लवू पार्सेकर,सुधीर पराडकर, देवा सुर्याजी, बाबली गवंडे, सुधीर आडिवरेकर, मदन पार्सेकर, बाळा चोडणकर, लवू कुडव, बाळू साळगावकर, निलेश कुडव, दीपक जोशी, आदी उपस्थित होते.











