पेंडूर परिसरात कोट्यावधी निधीतील विविध रस्ता विकासकामांची भूमिपूजन

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून 5 कोटी ९२ लाख निधी उपलब्ध

अमित खोत | मालवण : मोगरणे साळेल आणि खरारे रस्त्याला अखेर भाजप महायुती सरकारच्या माध्यमातून चालना मिळाली आहे. तांत्रिक बाबी मध्ये अडकलेला रस्ता अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोकळा झाल्यानंतर त्या दोन रस्त्यांसह पेंडूर परिसरातील विविध विकासकामांची भूमिपूजन करण्यात आली.

यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ अंतर्गत रा. मा. १८२ ते साळेल मोगरणे जाधववाडी पेंडूर ग्रा. मा. ३८७ रू ४ कोटी २७ लाख , पेंडूर खरारेवाडी रस्ता रू १ कोटी ४८ लाख, तसेच जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ अंतर्गत पेंडूर खरारे रायवाडी मुगाचीवाडी वेताळ मंदिर मार्ग ग्राम मा क्र. ३७२ रू ५ लाख व पेंडूर शेंगाडामाळ ग्रा मा क्र ३८३ रू ७ लाख व नागरी सुविधा योजना सन २०२३-२४ अंतर्गत पेंडूर काळसे मुख्य रस्ता ते खांदवाडी जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रू ५ लाख अश्या विविध कामांची भूमिपूजने महायुती च्या पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झाली.

यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच नेहा परब, उपसरपंच सुमित सावंत, सोसायटी चेअरमन दिपा सावंत, शक्तीकेंद्र प्रमुख शेखर फोंडेकर, आतीक शेख, संजय नाईक, साबाजी सावंत, गजानन सावंत, सत्यवान परब, बिपिन परब,अशोक परब, संदीप सरमळकर शिवसेना शिंदे गट बाबू कांबळी, रामू सावंत, ग्रा.पं.शैलेश परब, सदस्य सुनीता मोरजकर, समृध्दी सरमळकर, अश्विनी पेडणेकर, अमित सावंत, सुरेंद्र जबडे, कृष्णा पेंडूरकर, रामचंद्र पेडणेकर, नंदू परब, नंदू आपटे, आशिष आपटे, स्वप्नील आपटे, शैलेश गावडे, स्वप्नील मेस्त्री, पिंटू वालावलकर, नितीन सावंत ,मुरलीधर सावंत सुभाष सावंत, सुनील पेडणेकर तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेली कित्येक वर्षे रखडलेली कामे मार्गी लागल्याचे ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.