रत्नागिरी एसटी स्टँडच्या कामाला बऱ्याच कालावधीनंतर सुरुवात 

 

येणाऱ्या पावसाळ्यात हाल कमी होतील; प्रवाशांची अपेक्षा 

रत्नागिरी : तब्बल तीन ते चार वर्षे रखडलेल्या रत्नागिरीतील एसटी स्टँडच्या कामाला सुरुवात झाली आहे. या स्टँडसाठीमोठ्या प्रमाणात आंदोलने झाली असतांना आणि स्टँडअभावी ग्रामीण भागातील प्रवाशांचे गेली अनेक वर्षे हाल होत असताना या पाडलेल्या स्टँड परिसरात कामगारांची हालचाल सुरु झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

नवीन एसटी स्टँडचे चालू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, रत्न सिंधू योजनेची विशेष आमंत्रित सदस्य किरण सामंत यांच्या आदेशानुसार रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री राहुल पंडित, शिवसेना नेते सुदेश मयेकर, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, जेष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी कॉन्ट्रॅक्टर श्री तावडे यांना घेऊन सदर चालू असलेल्या नवीन कामाची पाहणी केली.

 

याचबरोबर शिवसेनेचे माजी नगरसेवक निमेश नायर, शहर संघटक संकेत घाग, माजी नगरसेविका कौशल्याताई शेटये, बारक्याशेठ हळदणकर, माजी नगरसेविका सौ श्रद्ध हळदणकर, महिला शहर संघटक श्रीम विनाताई रेडिज, श्री सौरभ मलुष्टे, युवा तालुका समन्वयक श्री सिध्देश शिवलकर, युवा शहर प्रमुख श्री अभिजित दुडये, श्री मंदार आंब्रे, श्री विनोद सावंत, श्री बाळू गांगण, प्रशांत सुर्वे, सौ संजना जोशी, सौ दिशा साळवी, श्रीम वंदनाताई सावंत, श्री विनोद सावंत, सौ मंजेरी शिंदे, सौ रूपा नागवेकर, श्री प्रथमेश साळवी, सौ अवनती गोळपकर, श्री भाऊ देसाई, श्री राहुल रसाळ, श्री पप्पू सुर्वे आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

एसटी स्टँडच्या कामाला सुरुवात झाल्याने आता यंदा तरी येणाऱ्या पावसात आमचे हाल थांबतील अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.