बुरंबावडे येथे काजूबागेला आग लागून साडेचार लाखाचे नुकसान

 

आचरा l अर्जुन बापर्डेकर : बुरंबावडे ता.देवगड येथे आडवाडोंगर परीसरात रविवारी लागलेल्या आगीत भिकाजी तुकाराम झगडे यांची काजू बाग जळून मोठे नुकसान झाले. यात सुमारे दिडशे काजू झाडे जळून अंदाजे साडेचार लाखाचे नुकसान झाले.

याबाबत उंडील तलाठी सुनीता मेस्त्री, कृषीसहाय्यक गजानन नाकाडे,बुरंबावडे पोलीस पाटील साक्षी मांजरेकर यांनी दुर्गम भागातील बागेच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला.आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही.ऐन काजू हंगामातच आलेल्या संकटाने झगडे कुटूंबाचे मोठे नुकसान झाले आहे.