ओसरगाव शाळेचा क्षेत्रभेट उपक्रम!

Google search engine
Google search engine

मसुरे | झुंजार पेडणेकर : ओसरगाव नंबर 1 शाळेच्या विध्यार्थ्यांनि दप्तरा विना शाळा अनुभवताना नर्सरीला भेट देत व्यवस्थापनाची माहिती घेतली. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलांनी ओसरगाव मधील साईश नर्सरीला भेट दिली. नर्सरीचे व्यवस्थापक दीपक आंगणे यांनीआपल्या नर्सरीतील सर्व झाडांची माहिती दिली. तसेच यावेळी कलम बांधणे याविषयी विशेष मार्गदर्शन केले. खुंटी कलम, भेट कलम यांचे उपयोग सांगितले .वृक्षारोपण कसं करायचं याचं मार्गदर्शन केलं. मुलांनी यामध्ये विज्ञान आणि भूगोल याचा प्रात्यक्षिक सहित अभ्यास केला आणि मनमुराद आनंद लुटला. यावेळी प्रणय परब, श्रेया चौकेकर यांनी मुलाखत घेतली.मुख्याध्यापक किशोर कदम,शिक्षक संतोष राणे, राजश्री तांबे उपस्थित होते.