देवरुख : देवरुख शहर सुंदर व स्वच्छ ठेवणेसाठी शहरातील नागरीकांनी स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. आपलं देवरुख. सुंदर देवरुख या अभियानाला १ आठवडा झाला हे नागरीक शहरात फिरुन जनजागृती व सकाळी ७ ते८ या वेळेत कचरा उचलतात. देवरूख शहरवासिय कचरा कुठेही टाकत आहेत. यापुढे कचरा टाकणेंवर सिसिटीव्हीने लक्ष ठेवले जात आहे. तसेचदंडात्मक कारवाईला सुरुवात झाली आहे. १काच आठवड्यात सहा हजार रुपये दंडातून वसुल झाले आहेत.
सीसीटिव्ही लावण्यात आले आहेत. त्यावर स्वयंसेवक लक्ष ठेवुन आहेत.सकाळी, रात्री काही नागरीक कचरा बाहेर रस्त्यावर टाकताना आढळले आहेत. त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात आला आहे.
हे काम जागरुक नागरीक स्वयंस्फूर्तीने करत आहेत. नगरपंचायतीने या नागरीकांना सहकार्य करीत आहे. प्लास्टिक पिशवी वापर व बाहेर टाकणारा कचरा यावर हे नागरीक लक्ष ठेवून आहेत.
चोरपर्या महाडीक स्टाँप , छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरक चौक, बस स्थानक. देवरूख-साखरपा रोड. या मार्गावर राजरोस कचरा टाकणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे