जुनी पेन्शन योजना सुरु करणे व अन्य दहा मागण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे पुकारलेल्या कामबंद आंदोलनास मंडणगड तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद

मंडणगड | प्रतिनिधी :. सराकारी निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत व अंशकालीन, कंत्राटी, रोजंदारी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्यवतीने सध्याची एन.पी. एस. यी पेन्शन योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य प्रलंबीत दहा मागण्यासाठी 14 मार्च 2023 पासून पुकारलेल्या बेमुदत संपास मंडणगड तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद लाभला. कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक वगळता सर्व स्तरातील कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. मंडणगड तालुक्यातील एकुण अकरा कर्मचाऱ्यांची संघटनाचे पदाधिकारी यांनी तहसिलदार विजय सुर्यवंशी यांच्याकडे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

यानंतर तहसिल कार्यालयाच्या आवारात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तालुक्यातील कर्मचाऱ्यांना सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संबोधीत केले. जुनी पेन्शन योजना पुर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासंदर्भातील घोषणा केल्याशिवाय मागे न हटण्याचा ठाम निर्धार कर्मचाऱ्यांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबीत मागण्याबांबत शासनाने ठोस भुमीका घ्यावी अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी आहे. यात पी.एफ. आर.डी.ए. कायदा रद्द करा, कंत्राटी, अंशकालीन रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमीत करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या बिनाशर्त करा, चतुर्थश्रेणी वाहनचालक पदे भरण्यावरील बंदी हटवा, शिक्षक शिक्षकेतर पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यात सत्वर मंजुर करा, कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द करा, आठव्या वेतन आयोग स्थापनेची कार्यवाही सुरु करा, या सहा दहा मागण्यांचा समावेश आहे.