फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — फोंडाघाट — झरयेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ महादेव तथा नाना बाबाजी आडवेकर ( ८८ ) यांचे वृद्धापकाळमुळे, त्यांचे राहते घरी दुःखद निधन झाले. त्यांनी निवृत्ती पूर्वी देवगड- खारेपाटण- जैयतापुर आणि फोंडाघाट येथे पोस्ट खात्यात सेवा बजावली होती.त्या प्रतिकूल परिस्थितीत सौजन्य,परोपकारी स्वभावामुळे ते जनमानसात आपले वाटत होते. त्यांचा लोकसंग्रह सुद्धा मोठा होता. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली असा परिवार आहे. फोंडाघाट वैश्य समाजा तील विशेष वसुली अधिकारी रजनीकांत यांचे ते पिताश्री होत. त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त होत आहे….












