निलेश राणे वाढदिवस विशेष लेख

 

सर्वसामान्यांचा बुलंद आवाज…

कोणतेही काम असो.. ते होण्याची शंभर टक्के खात्री.. बघतो.. करतो.. पहातो.. हे शब्द ज्यांच्या शब्दकोषात नाहीत.. आपल्याकडे कोणतेही काम घेऊन आलेल्या सर्वसामान्य जनतेसाठी, कार्यकर्त्यांसाठी कायमच तत्पर असणारे प्रत्येकांचं हक्काचं नेतृत्व म्हणजे निलेश राणे होत.. सर्वसामान्य जनतेच्या कामाचा झटपट निपटारा करून त्यांना न्याय देणारा सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणजे निलेश राणे..

गेली पंधरा वर्षे आपल्या भागातील जनतेच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी धडपडणारा एक हक्काचा माणूस म्हणजे निलेश राणे होत.. त्यामुळे आज प्रत्येक जण निलेश राणे साहेबांकडे गेलं की आपलं काम होणारच असे हक्काने बोलतो.. त्याचं एकमेव कारण म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी कायमच झटणारं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या कामाने, कार्यकतृत्वाने सर्वसामान्य जनतेच्या आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात ‘हक्काचा माणूस’ म्हणून निर्माण केलेली प्रतिमा होय.

राज्यात नव्हे तर देशाच्या राजकारणात एक वलयं असलेलं नाव म्हणजे ‘राणे’. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एक आगळी वेगळी ओळख आणि दरारा आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात काम करताना भाजपाचे नेते, माजी खासदार निलेश राणे व कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. निलेश राणेंच्या बाबतीत बोलायंचे झाले तर तरूणांचे आयडॉल असलेलं हे उमदं असे नेतृत्व आहे. सन २००९ पासून आजपर्यंत आपल्या वेगळया कार्यपध्दतीने आणि आक्रमक नेतृत्व शैलीने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकिय पटलावर एक वादळं निर्माण करणारं असं हे नेतृत्व आहे. पद असो वा नसो, सत्ता असो या नसो दबदबा आणि रूबाब आमचाच हे त्यांनी आपल्या कृतीतुन कायमच सिध्द केलंय. खासदार म्हणून त्या पाच वर्षात त्यांनी देशाच्या संसदेत आपल्या अभ्यासपुर्ण भाषणांनी पाडलेली छाप आणि विस्तीर्ण अशा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील प्रत्येक गाव आणि वाडीच्या कानाकोपऱ्यातील विकास कामांना दिलेला न्याय जनतेच्या आजही लक्षात आहे. दांडगा लोकसंपर्क आणि धडाडीने काम करण्याची त्यांची वृत्ती यामुळे आजही अगदी २० वर्षाच्या तरूणापासून ते ८० वर्षाच्या वयोवृध्दांनाही ते आपले वाटतात.

आपल्या मतदार संघात कायमच जनतेशी नाळ जुळलेल्या या नेत्याने कधीही जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही. निसर्ग चक्रीवादळ असो, फयान असो, पावसाळयातील अतिवृष्टी असो, आपल्या जनतेवर आणि कार्यकर्त्यावर ओवढलेला कोणताही बाका प्रसंग असो, समजताच क्षणी धाऊन येत प्रसंगी मदतीचा हात आणि आधार देण्याचं काम निलेश राणे यांनी केलं आहे व आजही करत आहेत. दिलेला शब्दा पाळणारा राजकारण आणि समाजकारणातील एक हक्काचा माणूस अशी त्यांची सामान्यांत ओळख आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयात भाजपा पक्ष संघटनेचे काम निष्ठेने करताना अगदी झोकून देऊन काम करण्याची त्यांची पध्दत कार्यकर्त्यांना उर्जा देते. सध्या त्यांच्यावर पक्षाने सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे विधानसभा प्रमुख म्हणून दिलेले जबाबदारी पार पाडताना त्यांनी घराघरात संपर्क साधून पक्ष संघटना अगदी भक्कमपणे बांधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकोउपयोगी योजना, शेतकरी सन्मान योजना, पिक विमा योजना, लघु उद्योजकांसाठी असलेली मुद्रा कर्ज योजना, गरीबांसाठी असलेली घरकुल योजना एक नाही अशा अनेक केंद्राच्या योजनांची माहिती घराघरात पोहचविण्याचे काम ते करत आहेत.

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांच्या सुक्ष्म, मध्यम व लघु मंत्रालयाच्या माध्यमातुन असलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविताना कोकणातील लघु उद्योजकांना या प्रवाहात आणले आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातुन असलेल्या योजनांचा कोकणातील उद्योजकांनी, तरूणांनी अधिकाधिक लात्र घ्यावा व उद्योजक बनावे, कोकणात उद्योजक तयार व्हावेत यासाठी ते झटत आहेत.

कायमच अन्यायाविरोधात पेटून उठा असे सांगत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे.
कोणताही प्रश्न असो त्या विरोधात बिनधास्पपणे आवाज उठविला आणि त्या प्रश्नांची तड लावली आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नांना वाचा फोडणारा नव्हे ते सोडवून देणारा हक्काचा आपला माणूस म्हणून आज अनेकजण निलेश राणे यांचे नाव घेतात.
अनेकांना निलेश राणे हे एक आक्रमक, करडया शिस्तीचे वाटतात.. हो ते तसे आहेतही.. पण त्यांच्यातही एक दिलदार मित्र.. संवेदनशील माणूस लपलेला आहे.. दौऱ्यात अनेक वेळा आपल्या सहकाऱ्यांची आपुलकीनं चौकशी करणारे निलेश राणे कधी कधी गप्पांच्या मैफिलीतही रंगून जातात.. अगदी दिलखुलासपणे.. प्रत्येकाची आवर्जुन चौकशी करतात..भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारून आपुलकीनं चौकशी करतात.. अनेकवेळा दौऱ्यात त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लहानांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाची चढाओढ लागलेली असते.. मात्र ते कुणालाही नाराज न करता प्रत्येकासोबत सेल्फी काढतात.. त्यामुळे ते प्रत्येकाला आपलेसे वाटतात. असे नेतृत्व कोकणाला आणि आमच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग वासीयांना लाभले हे आमचे भाग्यच.. अशा या दिलदार नेतृत्वाला वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा..!

नरेंद्र मोहिते-राजापूर