निलेशजी राणे साहेब…….विकास आणि रोजगाराची दुरदृष्टी असणारा नेता.

माजी खासदार सन्मा.डॉ.निलेशजी नारायणराव राणे वयाच्या 28 व्या वर्षी केंद्रामध्ये नेतृत्व करणारे कोकणातले उमदे नेतृत्व. खरतर निलेशजी आणि माझी भेट ४ ते ५ वर्षांपूर्वी गुहागर तालुक्यातील आरजीपीपीएल कंपनीतील सुरक्षा रक्षकांच्या समस्यां संदर्भात रत्नागिरी येथे झाली. त्यानंतर आम्हा दोघांमधले संबंध जिव्हाळ्याचे होऊन ते वाढतच गेले. कोणत्याही विषयावरती विविध प्रसार माध्यमांमधून आक्रमक भासणारे निलेशजी प्रत्यक्षात अनुभवायला मिळाल्यावर एक लक्षात आलं की हा माणूस प्रचंड हुशार, तेवढ्याच बुद्धिमत्तेच्या ताकतीचा, कोकणच्या विकासासाठी – रोजगार निर्मितीसाठी आग्रही,मनमिळाऊ आणि जिवाला जीव देणारा आहे. खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करतागुहागर तालुका हा तसा लांब.

*मात्र योगायोगाने कोणत्या ना कोणत्या कारणासाठी संपर्क वाढत गेला, त्यातून समन्वय निर्माण झाला आणि आज गुहागर तालुक्यासाठीच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी निलेश जणींच्या रुपाने आमचा एक हक्काचा माणुस झाला. निलेशजीं जवळ बोलत असताना,चर्चा करत असताना त्यांच्यामधील आणखी एक वैशिष्ट्य दिसून आल ते म्हणजे कोकणचा विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे याचा असणारा गाढा अभ्यास.त्या विकासाच्या माध्यमातून शहरांकडे वळणाऱ्या तरुणांच्या लोंढ्यासाठी रोजगार कसा निर्माण होईल आणि कोकणातच त्याचं जीवन सुख, समृद्ध आणि संपन्न कसे करता येईल याकडे निलेशजींचा विशेष भर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याधर्तीवर रत्नागिरी जिल्हा सुद्धा पर्यटन जिल्हा होण्यासाठी त्यांचे विशेष प्रयत्न चालू आहेत. या सर्व बाबींबरोबरच त्यांच्या संपर्कात येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निलेशजी देवदूतच असतात.प्रसंग कोणताही असो पोलीस स्थानकांपासून सर्व शासकीय कार्यालय ते रुग्णालयापर्यंत ठामपणे , विश्वासाने पाठीशी उभे राहतात.रुग्णांना अत्यावश्यक आणि खात्रीशीर सेवा देण्यासाठी निलेशजींच लक्ष असत. कोकणच्या सर्वांगीण विकास आणि कोकणातील तरुणांसाठी खात्रीलायक रोजगाराचं ध्येय उराशी बाळगणार हे एक अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राच्या विधानसभेत लवकरच पाहायला मिळणार आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना उदंड, निरोगी आयुष्याच्या आणि यशस्वी राजकीय भविष्याच्या अनंत शुभेच्छा !!
निलेश विश्वनाथ सुर्वे,अध्यक्ष – भारतीय जनता पार्टी, तालुका – गुहागर, जिल्हा – रत्नागिरी.*