देवगड l प्रतिनिधी :दीपावलीच्या पूर्वसंध्येला स्वररंग निर्मित ‘स्वरदीपोत्सव २०२५’ हा बहारदार संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपल्या आवडत्या गीतांचा हा मनमोहक कार्यक्रम येत्या शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, देवगड येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमात मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक कलाकार सौ. केतकी चेतन्य आणि श्री. अंजय पोंक्षे आपली गायकी सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी वाद्य संगीताची साथ देणार आहेत ऑर्गन वादक अमित मेस्त्री, हार्मोनियम वादक हर्षद जोशी, कीबोर्ड वादक राजन किल्लेकर आणि प्रसाद जाधव, तबला वादक सौरभ वेलणकर, पखवाज वादक नाशिक किराडकर आणि ऑक्टोपॅड वादक अभिषेक जाधव.
कार्यक्रमाचे ध्वनी संयोजन उदयराज सावंत यांचे असून प्रकाश योजना अभिषेक कोयंडे यांची राहणार आहे. निवेदक म्हणून निनाद कानिटकर सूत्रसंचालन करणार आहेत.
या कार्यक्रमाचा प्रवेश विनामूल्य असून उपस्थिती अपेक्षित आहे.
कार्यक्रमाचे संयोजन श्री. हर्षद जोशी (९४२३१ ६९६३२) आणि श्री. सौरभ वेलणकर (९४२३८ ९४७५६) यांनी केले आहे. दीपावलीच्या आनंदात संगीताची सरिता अनुभवण्यासाठी देवगडवासीयांनी या सुरेल मेजवानीचा जरूर आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.













