दापोली | प्रतिनिधी:- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ दापोलीचा ४२ वा पदवीदान समारंभ आज १८ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता सर विश्वेश्वरय्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पदवीदान समारंभासाठी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. रमेश बैस अध्यक्षस्थानी आणि विद्यापीठाचे प्रति कुलपती तथा मंत्री कृषि महाराष्ट्र राज्य मा. ना. श्री. धनंजय मुंडे दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित राहणार आहेत. पदवीदान कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी, माजी कुलगुरु, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई हे प्रत्यक्ष उपस्थित राहून स्नातकांना मार्गदर्शन करणार आहेत.
पदवीदान समारंभात बी. एस्सी. कृषि, उद्यानविद्या, वनशास्त्र, बी. बी.एम, कृषि जैव तंत्रज्ञान, बी. टेक. अभियांत्रिकी, फूड सायन्स, बी. एफ. एस्सी मत्स्य अशा एकूण १९७५ स्नातकांना पदवी तर एम.एस्सी. कृषि, वनशास्त्र, उद्यानविद्या, पी.एच.एम., कृषि जैवतंत्रज्ञान, एम.एफ. एस्सी. मस्त्य आणि एम. टेक. अभियांत्रिकी अशा १८६ स्नातकांना पदव्युत्तर पदवी आणि २७ स्नातकांना आचार्य पदवी अशा एकूण २१८८ स्नातकांना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे आणि प्रमुख पाहुणे पद्मभूषण प्रा. ज्येष्ठराज जोशी यांच्याहस्ते बहाल करण्यात येणार आहे. हा पदवीदान समारंभ ऑनलाईन व प्रत्यक्ष दोन्ही स्वरुपात होणार असून हा कार्यक्रम विद्यापीठाच्या फेसबुक आणि युटयुब लिंकवरुन प्रत्यक्षरित्या पाहता येईल. तरी सर्व निमंत्रितांनी या पदवीदान समारंभात सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी केले आहे.











