केंद्रीय मंत्री नारायण राणे याचे चरणस्पर्श करत किरण सामंत यांनी घेतले आशीर्वाद : शिवसेना, भाजप पदाधिकारी यांची उपस्थिती
अमित खोत | मालवण : भाजप नेते निलेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना रत्नागिरी सिंधुदुर्ग नेते किरण उर्फ भैय्या सामंत यांनी रविवारी रात्री मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट देऊन निलेश राणे यांना मैत्रीची शाल घालून शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित केंद्रीय मंत्री नारायण राणे याचे चरणस्पर्श करत किरण सामंत यांनी आशीर्वाद घेतले.
यावेळी भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, अशोक सावंत, विजय केनवडेकर धोंडी चिंदरकर, बाबा परब, राजू परुळेकर, आशिष हडकर यांसह भाजप पदाधिकारी तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, बबन शिंदे, राजा गावकर, किसन मांजरेकर, पराग खोत, बाळू नाटेकर, युवासेना कुडाळ मालवण जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, हर्षद पारकर, नितेश पेडणेकर यांसह अन्य उपस्थित होते.
बबन शिंदे यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची हाक
किरण सामंत यांच्या भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थितीत शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे यांना नावाने हाक मारत विचारपूस केली. यावेळी बबन शिंदे भावनिक झाले. राणे साहेबांच्या नेतृत्वात सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी म्हणून अनेक वर्षांपूर्वी काम केले. मात्र राणे साहेबांनी ओळख कायम ठेवली. नावाने हाक मारून विचारपूस केली. राणे साहेब खऱ्या अर्थाने कार्यकर्ता जपणारे नेते आहेत. अशी भावना बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी व्यक्त केली.










