तवसाळ ( सचिन कुळये )तवसाळ गाव पंचक्रोशी निसर्ग रम्य अशा ठिकाणी वसलेला गाव आहे. सोबतीला कोकणाला लाभलेला व तवसाळ गावाला अथांग समुद्र किनारा नदी नाले ओढे असं नटलेला गाव परंपरा चालीरिती जपताना पाहायला मिळते.
महामाई सोनसाखळी देवस्थान ट्रस्ट तवसाळ
श्री.देवी महामाई सोनसाखळीच्या सर्व भाविकांना कळविण्यात येते की 2024 चा शिमगोत्सव पुढील प्रमाणे
रविवार दिनांक 24/03/2024 या दिवशी रात्री ठिक 10.30 वाजता देवीचा रूपा लागेल व त्या नंतर मंदिरातून पालखी होमावर जाईल.
सोमवार दिनांक 25 03/2024 सकाळी ठिक 10.30 वाजता पालखी मंदिरातून हळदी कुंकवासाठी तवसाळ गावी येईल
मंगळवार दिनांक 26/03/2024 सकाळी 11.00 वाजता पालखी होमावर जाईल नंतर 12.00 वाजता होम पेटवला जाईल.
त्यानंतर तवसाळ ग्रामस्थ मंडळाचा तमाशा होईल,दुपारी 2.00 वाजता पालखी सहाणेवर येईल त्या नंतर पालखी दुपारी 3.30 वाजता तवसाळ आगर मध्ये होमावर जाईल, व सायंकाळी पालखी तवसाळ गावी सहाने वर विराजमान होईल.
श्री. देवी आई महामाई सोनसाखळी देवीच्या सर्व भाविकांनी पालखी देवदर्शनाचा लाभ घ्यावा शिमगोत्सवाच्या शुभेच्छा ,धन्यवाद.











