निर्मला जोशी यांचे निधन

 

मसुरे (प्रतिनिधी): बांदिवडे पालयेवाडी येथील श्रीमती निर्मला अनंत जोशी (९१ वर्षे) यांचे पनवेल येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या बांदिवडे ग्रामपंचायतीच्या १० वर्षे सदस्य होत्या. तसेच पाच वर्षे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सूना व नातवंडे असा परिवार आहे.