मसदे येथे २२ रोजी विविध कार्यक्रम 

मसुरे | झुंजार पेडणेकर :मालवण तालुक्यातील मसदे येथील मसदे तिठा ग्रामस्थ व रिक्षा संघटनेतर्फे २२ मार्च रोजी मसदे तिठा येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ८ वा. अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने, रात्री ८ वा. कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा ‘कपाल भैरव’ नाटक होणार आहे. तसेच सकाळी ९ ते १२ या वेळेत रक्तदान व मोफत नेत्र तपासणी शिबीर होणार आहे, सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले.