कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोर भीषण अपघात

कारचा टायर फुटून अपघात, ४ जण जखमी 
खेड (प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयासमोर मुंबईहून गुहागरला शिमगोत्सवासाठी येत असताना गाडीचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात गाडीतील चालकासह ४ जण जखमी होण्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.

इतर बातम्या – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपाचाच उमेदवार द्या 

मुंबई येथील एक कुटुंब आपल्या गुहागर येथील गावाला शिमगा उत्सवासाठी ( कार नंबर – एम. एच. ४७ – ए.बी. ९५०३ ) या गाडीने जात असताना चालकाला झोप अनावर न झाल्याने   गाडी रस्त्याच्या डिव्हायडरवर चढली हे लक्षात येताच चालकांनी पुन्हा रोडकडे उतरवण्याचा प्रयत्न करत असताना गाडीचा मागील टायर फुटून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला  असणाऱ्या जागेत उलटली. अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या नागरिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढले.

इतर बातम्या – खेड मधील भाजी विक्रेते राहुल जोध यांचे आकस्मिक निधन

त्याचवेळी खेडकडे येण्यासाठी निघालेले रुग्णवाहिका चालक श्री. आनंद घोले यांनी गंभीर जखमी चालकाला रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे.