भरणेत गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड

खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील भरणे येथील एसटी थांब्याच्या पाठीमागील झाडीझुडपात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री सुरू असलेली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली.
याप्रकरणी राजेंद्र काशिराम गोवळकर याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धाडीत २६० रूपये किंमतीची ५ लिटर दारू पोलिसांनी जप्त केली.