लायन्स क्लब खेड सिटी तर्फे आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

खेड प्रतिनिधी – लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. खेड तालुक्यातील दुर्गम भागांमध्ये तसेच प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास खेड पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विजय करपे, गटशिक्षणाधिकारी विजय बाईत, चंदुलाल शेठ हायस्कूल स्कूल कमिटी चेअरमन राजेश बुटाला, सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक संजय बुटाला, इंटरनॅशनल लायन्सचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ. वीरेंद्र चिखले, चंदुलाल शेठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष ला. महेंद्र शिरगावकर, सचिव ला. ओम जाधव, खजिनदार ला. माणिक लोहार, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी व माजी अध्यक्ष ला. सुरेश चिकने, माजी अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट हेड कॉर्टर प्रमुख ला. रोहन विचारे, उपाध्यक्ष ला. अविनाश दळवी, ला. हनीफ भाईघनसार, माजी सचिव ला. अनिल मोरे, ला. उत्तम कांबळे, ला. ज्ञानेश्वर मरकड यांच्यासह आदर्श गुरुवर्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावर्षी एकूण पंधरा शिक्षकांना ‘आदर्श गुरुवर्य सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. खेड तालुक्यातील विविध शाळांमध्ये अध्यापन करणाऱ्या या शिक्षकांनी शैक्षणिक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले योगदान अधोरेखित करण्यात आले. सर्व शिक्षकांचा पुष्पगुच्छ, शाल, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहन विचारे यांनी केले. सूत्रसंचालन ला. सुरेश चिकने यांनी केले तर आभार प्रदर्शन ला. अनिल मोरे यांनी मानले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे योगदान, त्याग आणि शैक्षणिक कार्याबद्दल भरभरून कौतुक व्यक्त केले. शिक्षकांच्या सन्मानार्थ झालेला हा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला.