जिल्हास्तर समिती सदस्यपदी आमदार योगेश कदम

खेड (प्रतिनिधी) धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा या निर्धन व दुर्बल घटकांमध्ये समावेश होणाऱ्या रूग्णांना पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्याकरिता गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीवर आमदार योगेश कदम यांची नुियक्ती करण्यात आली आहे.
 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कदम यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत त्यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे.