लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोचरी येथे रविवार दि.२४ व सोमवार दि २५ मार्च रोजी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कोचरी प्रिमीयर लीग २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोचरी मठाचा माल सुतारवाडी येथे ही स्पर्धा
होणार आहे. स्पर्धेयील प्रथम विजेत्याला १५,०००/- रोख रक्कम व आकर्षक चषक व द्वितीय पारितोषिक १०,००० रोख रक्कम व आकर्षक चषक असे बक्षीस दिले जाणार आहे,तसेच या स्पर्धेसाठी गावातील व गावाबाहेरील अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली आहे.
तरी या स्पर्धेसाठी उपस्थित राहून स्पर्धेतील खेळाडूंचे मनोबल उंचवावे असे आवाहन कोचरी प्रिमीयर लीग चे मुंबई कमिटी : अध्यक्ष-दत्ताराम बेंद्रे,उपाध्यक्ष- कल्पेश पवार,सचिव-पंकज खांडेकर,उपसचिव-प्रदिप गुरव, सहसचिव-रुपेश बने,खजिनदार-सुधिर कांबळे,उपखजिनदार-राजेंद्र डाफळे,ग्रामिण कमिटी : अध्यक्ष-सुरज बने,उपाध्यक्ष-संजय बेंद्रे,सचिव-मयुर कांबळे,उपसचिव-विरेश बने,खजिनदार-भरत गुरव,उपखजिनदार-राज कांबळे,प्रमुख सल्लागार मुंबई: राजाराम (काका) फापे,मच्छिंद्र कांबळे,सतिश पालेकर,प्रमुख सल्लागार ग्रामिण-संदेश कांबळे यांच्या तर्फे करण्यात आले आहे.











