आबलोली येथे हळद लागवडीचे प्रशिक्षण

अशोक रहाटे यांच्या सर्वात मोठा SK-4 हळदीचा गड्ड्याला ५५५५/- बक्षिस

गुहागर(प्रतिनिधी) : तालुक्यातील आबलोली येथील गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली आणि कोकण भूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था कोकण प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या प्रात्यक्षिकावर आधारित हळद लागवड प्रशिक्षणात

एसके – ४ ग्रुप तर्फे आयोजित या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा हळदीचा गड्डा आणणारे गुहागर तालुक्यातील जानवळे येथील अशोक राघो रहाटे यांना २.६०० किलो वजनाचा हळदीचा गड्डा काढल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे ५५५५/- रुपये बक्षिस देऊन गौरविण्यात आले.गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथे नुकतेच हे प्रशिक्षण उत्साहात पार पडले.

 

या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये एसके–४ (सपेशल कोकण-४)या हळदीच्या बियाणाचे प्रणेते आणि निर्माते सचिन कारेकर यांनी हळद लागवडीपासून तर काढणीपर्यंतचे सरव इततंभूत माहिती प्रातयक्षिकांसह प्रशिक्षणार्थ्यांना दिली. मातृकंद, कन्याकंद, हळकुंड,हळदीची रोपे यांची लागवड , वाफे काढाणे, मातीची भर देणे ,हळद काढणे, हळद उकळणे, वाळवणे, पावडर करणे , पावडरची साठवणूक कशी करावी, हळदीला बाजारपेठ याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन केले. हळकुंडापासून हळदीची रोपे कशी तयार करावीत याबाबतचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन गुहागरचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी केले.

या प्रशिक्षणाच्या वेळी आत्तापर्यंत ज्या – ज्या शेतकऱ्यांनी SK-4 या वाणाची हळद लागवड केली. त्यांचे मोठमोठे गड्डे तेथे प्रदर्शनात ठेवले होते. तसेच हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी व मागणी आणि पुरवठा यांचे गणित जमावे म्हणून शेतक-यांना बियाणं,हळदीची रोपे देऊन हळदीचे पीक घेण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. त्यासाठी एसके – ४ ग्रुप तर्फे स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध ठिकाणच्या १५ शेतक-यांचा यावेळी बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेमध्ये सर्वात मोठा हळदीचा गड्डा आणणारे गुहागर तालुक्यातील जानवळे येथील अशोक राघो रहाटे यांना २.६०० किलो वजनाचा हळदीचा गड्डा काढल्यामुळे त्यांना प्रथम क्रमांकाचे ५५५५/- रुपये बक्षिस देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक विलास शेलार,सांगवे (संगमेश्वर) यांनी २.०४० किलो साठी ४४४४/-,तिसरा क्रमांक देविका शेलार ,सांगवे (संगमेश्वर)-१.६४० किलो-३३३३/-,चौथा क्रमांक-अजित प्रभूलकर शिरगाव (चिपळूण)१.६३० किलो -२२२२/- पाचवा क्रमांक गणपत खंडागळे करंबेळे तर्फे देवळे(संगमेश्वर)-१.६०० किलो-११११/- व योगेश मोहिरे,वसंत मुकनाक,क्षितीज शिंदे,शिवाजी शेलार,रामदास घारव विजय माळी यांना प्रत्येकी *५००/-* प्रमाणे उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले.

यावेळी डॉ. मिनल ओक यांनी कृषी पर्यटन संस्थेच्या उपक्रमांची माहिती देऊन कृषी पर्यटनाची गरज विषद केली.

या कार्यक्रमात संगमेश्वरचे सहाय्यक गटविकास अधिकारी तथा कृषी अधिकारी विनोदकुमार शिंदे, गुहागर पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर.के.धायगुडे,कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, चिपळूण पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी बी.बी. पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी व प्रशिद्ध उद्योजक आणि गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोलीचे मालक व कृषी तज्ञ सचिन कारेकर, कृषी अधिकारी धायगुडे, कोकण भूमी कृषी पर्यटन सह.संस्था कोकण प्रांत अध्यक्ष प्रा.डॉ. मिनल ओक, पर्यटन संस्थेचे सचिव अमोल लोन, संचालक नंदादिप पालशेतकर आदी. मान्यवर उपस्थित होते. राई कृषी पर्यटन केंद्र गोळवलीचे संचालक आणि संस्थेचे सचिव अमोल लोध यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

या प्रशिक्षणामध्ये मुंबई, रायगड, रत्नागिरी, कणकवली या ठिकाणाहून ३२ शेतकरी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शेतकरी महिलाही या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाल्या होत्या.