वेरळ नजीक दोन दुचाकींचा अपघात एक जखमी

खेड | प्रतिनिधी : खेड खोपी मार्गावरील  वेरळ गोवळकरवाडी बस थांब्या नजीक  दोन दुचाकीचा समोरा समोर अपघात झाला यात एक जण जखमी झाल्याची घटना २० मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
कमलेश वसंत कुरमुरे रा. भडगाव उसरेवाडी ता. खेड असे जखमी झालेल्या चे नाव आहे या प्रकरणी राजाराम महादेव मेटकर  रा. भरणे घडशीवाडी ता. खेड यांनी तक्रार दाखल केली आहे. यातील कमलेश वसंतकुरमुरे रा. भडगाव उसरेवाडी ता. खेड यांचे मालकीची अॅक्टीव्हा गाडी क्र.एम, एच, ०८- ए.एम. १६०८ या गाडीने वावे ते खेड असा प्रवास करीत असताना कमलेश वसंत कुरमुरे हे गाडी चालवित होते व फिर्यादी हे त्यांच्या पाठीमागे बसले होते. त्यांची गाडी ही वेरळ गोवळकरवाडी बस स्टॉप पासुन सुमारे २० फुट अंतरावर पुढे आल्यावर वेरळ ते सवेणी जाणारा महेश रामचंद्र माने रा सवेणी गोपाळवाडी ता. खेड हा दुचाकीस्वार त्याचे ताब्यातील अॅक्टीव्हा गाडी क्र. एम एच ०८ बी ए १६८९ लाल रंगाची सिक्सजी ही रात्री ८ वा चे सुमारास  आपली डावी बाजु सोडुन रस्त्याच्या उजव्या  बाजुला येवुन अॅक्टीव्हा गाडीला समोरासमोर ठोकर देवुन अपघात केला. सदर अपघातात कमलेश कुरमुरे यास लहान मोठ्या दुखापती झालेल्या असुन त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली . या अपघातात फिर्यादी यांना कोणत्याही प्रकारे दुखापत झालेली नाही. तसेच सदर अपघातातील दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हूणून दुचाकी स्वार
महेश रामचंद्र माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे