हातखंबा – सुतारवाडी येथे घरफोडी; चोरट्यांनी पावणे सहा लाखांचा मुद्देमाल लांबवला

रत्नागिरी : प्रतिनिधी
हातखंबा – सुतारवाडी येथील घर फोडून चोरट्याने तब्बल पावणे सहा लाखांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना
1 नोव्हेंबर रोजीचे रात्री 11.३० वा. ते दि. 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वा. दरम्याने घडली आहे.
याबाबत मृणाल महेश पांचाळ (48,रा. हातखंबा – सुतारवाडी, रत्नागिरी,) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या लोखंडी कपाट ठेवलेल्या रुमची स्लाईडिंगची खिडकी कोणत्यातरी हत्याराच्या सहाय्याने उघडली. त्यानंतर घरात प्रवेश करून लॉक केलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा तोडुन कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले ४३ ग्रॅम वजनाचे एक मंगळसूत्र,१२ ग्रॅम वजनाचा एक गळ्यातील हार,६ ग्रॅम वजनाची एक अंगठी,९ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स,८ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स,५ ग्रॅम वजनाची कानातील चेन,९ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स ३,१ ग्रॅम वजनाचे नाकातील ४ फुले,१ ग्रॅम वजनाचे गणपतीचे पान,१ ग्रॅम वजनाचे सटवाई (टाक),१ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ असे एकूण 5 लाख 76 हजार किंमतीचे ९ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेलेले आहेत. याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.