लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला सन – २०२२ चा सलग तिसऱ्यांदा बँको ब्लू रिबन पुरस्कार महाबळेश्वर येथे प्रदान

Google search engine
Google search engine

लांजा | प्रतिनिधी : शहरातील लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला सन – २०२२ चा सलग तिसऱ्या बँको ब्लू रिबन पुरस्काराने महाबळेश्वर येथे सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात बळकटी । आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा पुणे यांचे तर्फे बँको ब्लू रिबन पुरस्कार देण्यात येतो. महाबळेश्वर येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात लांजा नागरी सहकारी पतसंस्थेला जनता सहकारी बँक लि.ठाणेचे चेअरमन शरद गांगल यांचे हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे तरुण संचालक प्रसाद बेंडखले, किशोर यादव, व व्यवस्थापक चंद्रशेखर रुमडे यांनी तो स्वीकारला.
सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व संचालक व कर्मचारी पिग्मी एजंट यांचे लांजा शहरातून कौतुक केले जात आहे.