गुडेघर उपविजेता; तुषार माळी उत्कृष्ट फलंदाज; अभिषेक जाधव उत्कृष्ट गोलंदाज
मंडणगड : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने मनसे वर्धापन दिनानिमित्त देव्हारे विभागात केळशी फाटा येथे आयोजित करण्यात आलेला मानाचा मनसे चषक हा श्रीसतीदेवी क्रिकेट संघ पालेकोंड यांनी पटकावला. तर उपविजेता भैरवनाथ क्रिकेट संघ गुडेघर संघ ठरला. तसेच तृतीय क्रमांक शिवशंभो क्रिकेट संघ पालेगाव संघाने मिळविला. ता.१२ मार्च रोजी हा क्रीडा थरार रंगला.
२४ संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेचे उदघाटन मनसे मंडणगड तालुकाध्यक्ष महेश कंचावडे यांच्या हस्ते करण्यात आले. सुप्रसिद्ध समालोचक राजेश कुळे, एमसीएचे पंच, लाईव्ह प्रेक्षपण हे या स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. सुजय स्पोर्टस या युट्युबवर लाईव्ह प्रेक्षपण करण्यात आले. तालुक्यातील मातब्बर संघांमध्ये सर्वच सामने अत्यंत चुरशीचे आणि उत्कंठावर्धक झाले. अंतिम सामन्यात गुडेघर संघाने प्रथम फलंदाजी करताना १२ चेंडूत १६ धावांचे लक्ष पालेकोंड संघासमोर ठेवले. शेवटच्या चेंडूवर दोन धावा पटकावत पालेकोंड संघाने मनसे चषकावर आपले नाव कोरले. तर तृतीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीत पालेगाव संघाने देव्हारे संघावर मात केली.
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अजय माळी, उत्कृष्ट फलंदाज तुषार माळी, उत्कृष्ट गोलंदाज अभिषेक जाधव व सामनावीर, मालिकावीर या दोन्ही पुरस्काराचा मानकरी सचिन माळी हा खेळाडू ठरला. विजेत्याना प्रथम २० हजार ५५५, द्वितीय १० हजार ५५५ , तृतीय ५ हजार ५५५ व भव्य आकर्षक चषक, टी शर्ट, बॅट, सन्मानचिन्ह, मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेला मनसे संपर्क अध्यक्ष बबन महाडिक, तालुकाध्यक्ष महेश कंचावडे, सुप्रसिद्ध समालोचक राजेश कुळे, विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष तेजस घस्ते, विद्यार्थी सेना संपर्क अध्यक्ष विनायक हंबीर, विद्यार्थी सेना उपजिल्हा अध्यक्ष नवज्योत सिंग गौड, उपतालुका अध्यक्ष रवी पवार, अनिल गमरे, उपाध्यक्ष मंगेश दळवी, श्री.मांद्रे, सचिन शिगवण उपस्थित होते. ही स्पर्धा उत्कृष्ट आयोजन, उत्तम नियोजन युवा आयोजक पंकज दुर्गवले, सुहास मोडकले, सुनील कुळे, पंकज पवार, विनायक हंबीर, संतोष पवार, प्रथमेश घाणेकर, प्रशांत मेडेकर, सुरज गावणुक यांनी विशेष अनमोल योगदान आपल्या अथक मेहनतीने परिपूर्ण यशस्वीपणे संपन्न केली.