जनशताब्दीसह मांडवी ला रिग्रेट , कोकणकन्या तुतारी एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी ४०० वर
खेड(प्रतिनिधी) शिमगोत्सवासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १०
होळी स्पेशल तर पश्चिम रेल्वेने २ होळी स्पेशल चालवत चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. मात्र, होळीसह सलग सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या मांडवीसह जनशताब्दी एक्सप्रेसचे स्लीपर श्रेणीचे आरक्षण रिग्रेट दाखवत आहे. कोकणकन्या तुतारीसह एलटीटी-मडगाव एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी ४०० वर पोहचली आहे. यामुळे गाव गाठायचे कसे, याची चिंता चाकरमान्यांना सतावत आहे.
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या होळी स्पेशल ९ मार्चपासून तर काही होळी स्पेशल १५ मार्चपासून कोकण मार्गावर धावत आहेत. या होंळी स्पेशल गाड्यांचे आरक्षण यापूर्वीच हाऊसफुल्ल झाले असून असंख्य प्रवाशी प्रतीक्षा यादीवरच आहेत. शिमगोत्सवासाठी चाकरमानी गावी डेरेदाखल होत आहेत. याचमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या नियमित गाड्यांसह होळी स्पेशल विक्रमी गर्दीनेच धावत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून चालवण्यात येत असलेल्या होळी स्पेशल अपुऱ्याच पडत आहेत. चाकरमान्यांची गावी येण्यासाठी लगबग सुरू झाल्याने तोबा गर्दीतून प्रवेश मिळवताना दमछाकच होत आहे. प्रसंगी चाकरमान्यांना आतापासूनच लोंबकळत प्रवास करावा लागत आहे.
.मध्य रेल्वेच्या १०. होळी स्पेशल तर पश्चिम रेल्वेच्या
अहमदाबाद-मडगाव व उधना-मंगळूर या २ होळी स्पेशल चाकरमान्यांच्या दिमतीला असल्या तरी या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्लच झाले आहे. या स्पेशलही विक्रमी गर्दीनेच धावत आहेत.
होळीसह सलग ३ दिवस सुट्ट्यांमुळे नियमित गाड्यांचे प्रतीक्षा यादीवरील तिकीटही मिळणे कठीण झाल्याने चाकरमान्यांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. मांडवी व जनशताब्दी एक्सप्रेसचे २३, २४ मार्चचे स्लीपर श्रेणीचे आरक्षण रिग्रेटच दाखवत असल्याने चाकरमान्यांचा हिरमोडच झाला आहे. याशिवाय तुतारी, कोकणकन्या व एलटीटी एक्सप्रेस गाड्यांच्या आरक्षणाची स्थिती ४०० वेटिंगवर असून ती देखील रिग्रेट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे गाव गाठताना चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागणार आहे.
कोकण व मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण
आणखी जादा होळी स्पेशल चालवा! शिमगोत्सवात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची लक्षणीय संख्या लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने आणखी होळी स्पेशल चालवण्याचा आग्रह कोकण विकास समितीसह जल फाऊंडेशन व प्रवाशी संघटनांकडून केला जात आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने मागणीची अजून तरी फारशी दखल घेतलेली नाही. केवळ एक्सप्रेस गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर आणखी जादा होळी स्पेशल चालवून चाकरमान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
मार्गावर ४ फेब्रुवारीपासून फक्त रविवारी चालवण्यात येणारी पनवेल-चिपळूण-रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशल विक्रमी गर्दीने धावत
आहे. मेमू स्पेशलला प्रवाशांचा उदंड प्रतिस लाभत असतानाही आठवड्यातून फक्त रविवारीच चालवण्यात येत आहे.शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल-चिपळूण रत्नागिरी मेमू स्पेशल ३१ मार्चपर्यंत चालवत येणार आहे. ही दिलासादायक बाब असल तरी शिमगोत्सव कालावधीत सर्वच दिवशी चालवण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. शिमगोत्सवासाठी ८ मार्चपासून दिवा रोहा-चिपळूण मेमू स्पेशल कोकण मार्गावर धावत होती. मात्र, माणगाव व रोहा येथील प्रवाशांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर मध्य रेल्वे प्रशासनाने सावध भूमिका घेत मेमू स्पेशलच्या १५ मार्चपासूनच्या सर्व विस्तारित फेऱ्या रद्द केल्याने चाकरमान्यांचा हिरमोडच झाला. मेमू स्पेशलच्या फेऱ्या रद्द झाल्यानंतर चाकरमानी अजूनही पर्यायी गाडीच्या प्रतीक्षेतच आहेत.











