शेकडो वर्षांची काटखेळी प्रथा जोपासतेय खेमधील मुरडे आणि तिसे गाव

 

अंगात शर्ट, कमरेत घागरा, डोक्यात फेटा आणि पोटाला पट्टा अनोखा पेहरवाची प्रथा

खेड(प्रतिनिधी) कोकणात शिमगास्तवाची धूम सध्या सुरू असून कोकण आपल्या आगळ्या वेगळ्या प्रथेमुळे संपूर्ण राज्यात आपले वेगळेपण टिकवून आहे, खेडमध्ये काटखेळी ही शेकडो वर्षांपासून चालत आलेली प्रथा आजही तितक्याच उत्साहात आणि भक्तीभावाने जोपासली जाते, पुरुष अर्धसाडी ( घागरा ) नेसतात, अंगात शर्ट आणि डोक्यावर भगवा फेटा आणि पोटाला पट्टा बांधून, हातात काठ्या घेऊन खेळ करतात त्यालाच काटखेळी असे म्हणतात.हा खेळ मुरडे व तिसे ग्रामस्थ यांनी आज ही जपला आहे

खेडमधील मुरडे येथील राम वरदायिनी देवी तसेच तिसे येथील या देवीची बहीण देवी काळकाई संपूर्ण खेड तालुक्यात याच ठिकाणी काटखेळी ही प्राचीन परंपरा जोपासले जाते देवीच्या जागर करण्यासाठी होळीच्या अगोदर काटखेळी करणारे मानकरी देवीला कौल लावतात व देवीला कौल लावून झाल्यानंतर देवीच्या साडीचा प्रत्येक काटकीळी करणारे कलाकार त्याचा घागरा बांधतात, अंगात शर्ट डोक्यावरती फेटा बांधून पोटाला आणि छातीला पट्टा बांधून तसेच हाताच्या दंडाला धागा बांधून गावामध्ये काटखेळी खेळण्यासाठी सज्ज होतात, मुरडे तिसे या ग्रामदेवतांच्या शेकडो वर्षापासून चालत आलेल्या या प्रथेला आजही तितक्याच उत्साहात आणि भक्ती भावाने जोपासली जाते, देवीचा कौल लावून काटखेळी करणारे मंडळी बाहेर पडल्यानंतर थेट होमाच्याच दिवशी आपल्या मंदिरात येऊन पुन्हा पालखी नाचवणे, प्रत्येक घरासमोर काठी मारणे, शिंपण्याच्या दिवशी कौल लावूनच या सर्व काटखेळी करणाऱ्यांचा घागरा सोडला जातो, त्यानंतर शिंपणे केले जाते दरम्यान देवीला कौल लावूनदेवीचा जागर करण्यासाठी काटखेळी करणारे कलाकार अर्थातच मंडळी होमाच्या दिवशी देवीचा होम लागल्यानंतर पुन्हा कौल लावून शिंपणे करून नंतरच घरी जातात अशी प्रथा खेडमधील मुरडे, आणि तिसे या दोन गावांमध्ये काटखेळी ही प्रथा गेल्या शेकडे वर्षापासून जोपासली जाते आहे

।ही संस्कृती ही प्रथा आमचा अभिमान आहे. शेकडो वर्षांनंतर देखिल तितक्याच उत्साहात या प्रथा आम्ही जोपासतो, एक आगळीवेगळी प्रथा आहे लोक नवसदेखिल करतात तसेच नवस फेडण्यासाठी देखील देवीच्या काटखेळी करणाऱ्या मंडळींना
आपल्या घरात बोलवले जाते, असे प्रतिक्रिया मुरडे गावचे माजी सरपंच आणि देवस्थानचे मानकरी श्री दिगंबर दळवी यांनी संगितले.