आरवली येथील श्री वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांचा अंगरखा घालून बांधली महापूजा..

वेंगुर्ले l दाजी नाईक :आज दिनांक २५ मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधुन आरवली येथील प्रसिद्ध श्री देव वेतोबा देवाला सुरंगीच्या फुलांचा अंगरखा घालून महापूजा बांधण्यात आली आहे. वेतोबा मंदिरात अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने देवाची पूजा बांधण्याची प्रथा आहे.

आरवली पंचक्रोशीत सुरंगी फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री देव वेतोबा ला सुरंगी फुलांचा अंगरख्याने सजवून महापूजा बांधण्यात आली आहे. देवाची ही महापूजा पाहण्यासाठी आणि देवाच्या दर्शनासाठी दुपारपासून भाविकांची गर्दी होत आहे.