अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ उदमांजरांचा मृत्यू

लांजा वनविभागाकडून माहिती 

लांजा (प्रतिनिधी) लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर अज्ञात वाहनाची धडक बसून मृत झालेली बिबट्या सदृश दोन बछडे म्हणजे दुर्मिळ प्रजातीमधील दोन उदमांजरे असल्याचे स्पष्ट झालेआहे. दरम्यान वन विभागाने या दुर्मिळ प्राण्यांना चिरडणाऱ्या वाहनाचा शोध सुरू केला आहे.

रविवारी २४ मार्च रोजी लांजा धुंदरे दाभोळ मार्गावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या सदृश दोन बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. दोन दुर्मिळ प्राण्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यावर वनविभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन कोणता प्राणी असावा, यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे माहिती अहवाल मागवला होता. वनपाल दिलीप आरेकर यांनी सकृतदर्शनी रानमांजराची पिल्ले असण्याची शक्यता वर्तविली होती. पशुसंवर्धन अधिकारी श्रीमती प्राजक्ता बर्वे, वनरक्षक श्री. वाघाटे यांनी मृत दोन प्राण्यांचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यात आले.

बिबट्या सदृश असलेले प्राणी हे दुर्मिळ असे उदमांजर असल्याचे स्पष्ट झाले. त्या दोन प्राण्यांना दफन करण्यात आले