दोडामार्ग बस स्थानकासमोरून मोटार सायकल चोरीस..!

दोडामार्ग | सुहास देसाई : काल बाजारात चोरी झाल्यानंतर आज दोडामार्ग बस स्थानकासमोर लावलेली मोटार सायकल आज सकाळी अज्ञात व्यक्ती चोरी करुन नेत असताना सिसीटिव्ही फुटेज मध्ये सापडली आहे. मात्र चोरटा गोव्याच्या दिशेने गेल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. तालुक्यात दुचाकी वाहन चालकांत घबराट निर्माण झाली आहे. याकडे पोलीस यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी गोवा राज्यात नोकरीसाठी दररोज ये जा करणारे व गाडी पार्क करणाऱ्या युवकातून होतं आहे.


सविस्तर वृत्त असे की. दोडामार्ग बस स्थानकासमोरील परफेक्ट डेकोरेकर दुकानाचे मालक प्रवीण कृष्णा गवस यांचे मालकीची (जि ए 01 डब्लू 4055) हि मोटर सायकल सकाळीं आपले दुकानासमोर पार्क केली होती. चुकून गाडीची चावी गाडीला राहिली माञ त्यांना लक्षात आले नाही सायंकाली त्यांना गाडी दिसली नाही म्हणुन शोधाशोध केली असतां गाडी चोरीला गेल्याची घटना समोर आली त्यांनतर त्यांनीं पोलीस स्टेशनला तक्रार केली. महिला पोलिसांनी तात्काळ दखल घेत फुटेज तपासले.यावेळी ही घटना समोर आली.

दरम्यान दोडामार्ग नगरपंचायत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या सह युवकांनी पोलीस स्थानकात धाव घेतली व त्या नंतर पोलीस स्टेशन मधील चौकशी मध्ये सी सी टिव्ही फुटेजः मध्ये दोन युवक मालकां समोरून गाडी चोरून गोव्याचे दिशेने जात असल्याचं समजलं त्या पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाही सुरू केली याबाबत अधिक तपास सुरू आहे.