माखजन |वार्ताहर : संगमेश्वर पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती नसरीन मुश्ताक खडस यांचा माखजन इंग्लिश स्कूल येथे सत्कार करण्यात आला.
त्या माखजन येथे एस.एस.सी.व एच.एस.सी केंद्रावर यावर्षी कस्टडियन म्हणून कार्यरत होत्या.काही दिवसात त्या सेवेतून निवृत्त होत असल्याने माखजन येथील केंद्राकडून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.त्यांनी आपल्या सेवेत आपले कर्तव्य बजावत अनेकांना आपलेसे केले.कर्तव्य दक्ष आणि कार्य कुशल असलेल्या श्रीमती खडस यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माखजन केंद्र प्रमुख व माखजन इंग्लिश स्कूल च्या मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,कोंडीवरे हायस्कूल चे मुख्याध्यापक झाकीर हुसेन नागोरे, करजुवे हायस्कूल चे मुख्याध्यापक अशोक कुवळेकर,नायशी हायस्कूल चे मुख्याध्यापक आनंदा घाटगे,माखजन हायस्कूल चे पर्यवेक्षक अंबादास घाडगे,सचिन कदम,अभिजित सुर्वे,ओंकार नामजोशी,अभिजित सहस्त्रबुद्धे, गौरव पोंक्षे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिन साठे यांनी केले.












