वेंगुर्ले महाविद्यालयात गुटखा, सिगारेट, तंबाखू पाकिटे, दारू बाटल्या यांचे दहन…

चला करूया व्यसनांची होळी” कार्यक्रमातून दिला जनजागृतीपर संदेश….

वेंगुर्ले l दाजी नाईक :समाजात व्यसनमुक्त उत्सव साजरा करणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन नशाबंदी मंडळ सिंधुदुर्ग च्या वतीने होळी या सणाचे औचित्य साधून व्यसनमुक्त होळीचा सण साजरा करण्यात यावा यासाठी जनजागृती करण्याकरिता “चला करूया व्यसनांची होळी”

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेंगुर्ले खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात गुटखा, सिगारेट, तंबाखू पाकिटे, दारू बाटल्या यांची होळी प्रभारी प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्राध्यापक वामन गावडे यांच्या हस्ते दहन करून होळी साजरी करण्यात आली. तर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र सिंधुदुर्गच्या जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर यांनी व्यसनमुक्ती शपथ प्रदर्शित केली.

व्यसनाधीनता ही एक न्यूरोसायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये औषध वापरण्याची सतत आणि तीव्र इच्छा असते किंवा मोठ्या प्रमाणात हानी आणि इतर नकारात्मक परिणामांना न जुमानता नैसर्गिक प्रतिफळ देणारे वर्तन असते. वारंवार औषधांचा वापर केल्याने मेंदूच्या कार्यामध्ये बदल होतो ज्यामुळे लालसा कायम राहते आणि आत्म-नियंत्रण कमकुवत होते. सिगारेट ओढणे, दारू पिणे, वा अन्यामादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो, अशी माहिती यावेळी बोलताना तालुका अंमली पदार्थ व व्यसन विरोधी समिती, जनसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष व न्याय वैद्यक, वीष शास्त्र विभागप्रमुख डॉ संजीव लिंगवत यांनी दिली.

बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र, अंमली पदार्थ व व्यसन विरोधी समिती, वेंगुर्ले जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने “चला करूया व्यसनांची होळी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर, प्रभारी प्राचार्य व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वामन गावडे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जनसेवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत, वेंगुर्ले तालुका अंमली पदार्थ व व्यसन मुक्ती समिती सचिव सत्यवान साटेलकर, जयराम वायंगणकर, मा. नगरसेवक विधाता सावंत, प्राध्यापक विरेंद्र देसाई, प्रा. जयसिंग नाईक,प्रा. पांडुरंग गावडे, प्रा. विवेक चव्हाण, प्रा. संजीव चमणकर, प्रा. लक्ष्मण नैताम, गोपुरी आश्रम व्यवस्थापक अमोल सावंत, अंकिता भारति, नेहा मळगावकर, सुहानी मांजरेकर, चातुर्या तांडेल, दक्षता ठाकुर, उत्कर्षा खोबरेकर, नयना धुरी, डिंपल मोंडकर, गणेश गावडे, वृषाली मठकर, उत्कर्षा परब, पुर्वा गावडे, दिव्या धर्णे, तन्वी गावडे आदी मान्यवर शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.