रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवा ग्रामप्रदक्षिणेसाठी मंदिरातून बाहेर पडले असून त्यांची पालखी झाडगाव येथील सहाणेवर विराजमान झाली आहे. दरम्यान शुक्रवार दिनांक 29 मार्च रोजी श्री देव भैरीची पालखी दुपारी 12 वाजता मुरूगवाड्यात ग्राम प्रदक्षिणेसाठी झाडगांव येथील सहाणेवरून निघेल परत रात्री 10 वाजता येईल तरी सहाणेवर पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी याचीनोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.












