आंबव पोंक्षे शाळेला श्री अशोक पोंक्षे यांची देणगी

माखजन |वार्ताहर :       संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबव पोंक्षे शाळेला ,शाळेचे माजी विद्यार्थी,ज्येष्ठ रंगकर्मी,सामाजिक कार्यकर्ते व श्री सूर्यनारायण संस्थेचे अध्यक्ष श्री अशोक पोंक्षे यांनी ५१ हजारांची देणगी दिली.

यातून शाळेच्या भौतिक गरजा भागवल्या जाणार आहेत.देणगी दिल्या प्रसंगी श्री अशोक पोंक्षेंसह,श्री अविनाश पोंक्षे,श्री हनुमान पोंक्षे,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्राची पाटणकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.गुरव,उपाध्यक्ष श्री प्रकाश कदम,सरपंच शेखर उकार्डे,उपसरपंच मंगेश मांडवकर,सुनील घडशी,राष्ट्रवादी काँग्रेस चे संगमेश्वर तालुका मुंबई संपर्क प्रमुख सुरेश घडशी,मंगेश शिगवण,अंगणवाडी सेविका सौ भायजे,सौ तांबे ,आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरव पोंक्षे यांनी केले.