माखजन | वार्ताहर : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे झालेल्या युथ गेम्स २०२३ मध्ये माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये अंडर १२ मिक्स रिले मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवले.यामध्येयुवराज जड्यार,आरुष पवार,कृतिका गोताड,गौरी गुरव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.तर २००,१५०,८० मीटर धावणे प्रकारात,जान्हवी गोताड,दर्पण कातक,हर्षद घडशी,सर्वेश किंजळकर,बुश्रा कापडी गंधर्व कवळकर,या विद्यार्थ्यांनी तर मल्लखांब प्रकारात,आर्यन घेवडे,रोहन शिंदे,चिन्मय पगडे वेदांत मेस्त्री यांनी मोहोर उमटवली. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्था व शाळेतर्फे सन्मान करण्यात आला.यावेळी क्रीडा शिक्षक निखिल वारके यांनी घेतलेल्या मेहनतीला दाद म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्था उपाध्यक्ष श्री मनोज शिंदे,सदस्य सतीश साठे,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साठे यांनी केले.