कणकवली परबवाडीच्या खमंग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

रविवारी होणार अंतिम सामना

कणकवली : कणकवली शहरातील परबवाडी येथील श्री ब्राह्मण देव मित्र मंडळाच्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँगेस जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक अबिद नाईक, संजय कामतेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
या खमंग क्रिकेट स्पर्धेत विजेत्या संघाला 12000 रुपये आणि बकरा देण्यात येणार आहे तर उपविजेत्या संघाला आठ हजार रुपये आणि पाच गावठी कोंबड्या देण्यात येणार आहेत.

येथील रेल्वे स्टेशन नजीक कणकवली नळ योजनेच्या पाण्याच्या टाकी नजीक सुरू असलेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 31 मार्च रोजी होणार आहे. स्पर्धेदरम्यान इतर वैयक्तिक बक्षिसे जाहीर होत असल्याने स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. नलावडे श्री. नाईक यांचा मंडळाच्यावतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.