Finally, the stall removal campaign in Kankavli has stopped for the next 15 days.
हे पंधरा दिवस सीजनचे, धंद्याचे आहेत त्यानंतर आम्ही आमचे स्टॉल हटवतो.!
स्टॉलधारकांचे प्राधिकरण आणि यंत्रणेला लेखी पत्र.!
कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील हायवे चौपदरिकरण उड्डाणपुलाखाली असलेले कणकवली पटवर्धन चौकातील स्टॉल हे हायवे प्राधिकरण आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून हटविण्यात आले होते //मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हायवे उड्डाणपूला खाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी स्टॉल उभारले// याच पार्श्वभूमीवर हायवे प्राधिकरण चे अधिकारी आणि पोलीस प्रशासन पुन्हा एकदा कणकवली पटवर्धन चौकातील स्टॉल हटाव मोहिमेला दुपारच्या सुमारास उतरले // जेसीबी आणि पोलीस बंदोबस्ताच्या सहाय्याने काही स्टॉल देखील हटवले आहेत// मात्र कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी अटकाव करत. साहेब हे प्रकार थांबवा.!// जनसामान्य गोरगरीब जनता या ठिकाणी स्वतःचे पोट भरत असल्याचे सांगत ही स्टॉल आता मोहीम थांबवली// उड्डाण पुलाखाली स्टॉल हटवून तुम्ही या ठिकाणी गार्डन करणार आहात की या ठिकाणची जागा डेव्हलप करणार// हायवे पूर्ण होऊन चार वर्षे झाली चार वर्षात तुम्ही काय केला ते दाखवा ? // आणि नंतरच स्टॉल हटवा असे सांगत कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी स्टॉल हटाव मोहीम थांबवली// मात्र यावर न थांबता प्राधिकरण आणि प्रशासनाने कारवाईचा बडगा सुरूच ठेवला// तसेच स्टॉल धारकांनी याच महिन्यात पंधरा ते वीस दिवस सिजनचा धंदा असतो असे सांगत// आम्ही पुढील पंधरा – वीस दिवसांनंतर आम्ही हे स्टॉल स्वतःहून बाजूला करतो// स्टॉल हटविण्यासाठी आपणास याठिकाणी यायची गरज भासणार नसल्याचे देखील लेखी लिहून दिले// त्यानंतर पुढील कारवाई थांबविण्यात आली// यावेळी पुलाखाली आपला धंदा करत असलेले फळे, फुले, भाजीपाला विक्रेते तसेच कलमठ गावचे सरपंच संदीप मेस्त्री, फुल विक्रेते बाळा पावसकर, पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, अनिल हाडळ, महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळे, पोलीस हवालदार मंगेश बावधाने, विनोद चव्हाण, दंगल नियंत्रण पथक, स्वरूप कोरगावकर, प्रसाद कोरगावकर, बंटी पावसकर, भाई पावसकर, यांच्यासह उड्डाणपुलाखालील स्टॉल धारक दरम्यान उपस्थित होते.