खेड-दापोली मार्गावर लागली आग

 

 

खेड(प्रतिनिधी)खेड-दापोली मार्गावरील सहजीवन हायस्कूलसमोरील एका घरानजीक गुरूवारी दुपारी १२.३० च्या सुमारास अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. या आगीत एका बांधकाम व्यावसायिकाच्या सेंटरिंग लाकडी साहित्यालाही आग लागली.

 

ही बाब काही नागरिकांनी नगर परिषदेच्या अग्निशमक केंद्रास कळवल्यानंतर फायरमन दीपक देवळेकर, शाम देवळेकर, सहाय्यक फायरमन जयेश पवार, प्रणय रसाळ, वाहनचालक गजानन जाधव यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून आग काही क्षणातच आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमक दलातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.