२८ विद्यार्थ्यांनी घेतला होता सहभाग, संस्थेने केला गुणवंतांचा सत्कार
चिपळूण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचा गुरूवारी निकाल जाहीर झाला आहे. त्यात मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूलचे चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत. त्यामुळे संस्थेच्यावतीने गुणवत्तांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा झाली होती. या परिक्षेत दलवाई हायस्कूलच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील २८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये इयत्ता तिसरीतील वेद माळी हा राज्य गुणवत्ता यादीत २५ वा, श्रीश नटे १९२ वा, सहावीमधील स्वराज भडवळकर १२४ वा व सातवीतील सई मते १९३ वी आली आहे. तर इयत्ता दुसरीमधील हर्ष घोले, सुचित्रा गुडेकर, समृध्दी होळकर, रोशनी निवाते, इयत्ता तिसरीमधील ईश्वरी चिले, युवराज जाधव, स्वरूप सन्नाक, इयत्ता चौथीमधील ध्रुवी बोलाडे, सारा जाधव, ओम पवार, विहान तांबिटकर, इयत्ता सहावीमधील आराध्य कांबळे, रूद्र महाडीक, अक्षरा निकम, गंधर्व सागवेकर, रितेश तटकरे, इयत्ता सातवीमधील स्वराज धाडवे, कावेरी धरवे, सिद्धी गोपाळ, श्रुती मोहिते हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या स्कूल कमिटी चेअरमन खालील दलवाई, शाळा व्यवस्थापन समिती प्राथमिक विभागाचे अध्यक्ष राजेश जाधव, मुख्याध्यापक रोहित जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मयुरी तटकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक उपस्थित होते.











