आई वडील रस्त्याचे काम करत असताना झाडाखाली झोपवलेल्या दीड वर्षीय बालकाला सर्पदंश

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील खानवली येथे झाडाखाली झोपवलेल्या दीड वर्षांच्या मुलाला सर्पदंश झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवार 29 मार्च रोजी दुपारी 1 वा. घडली.

पवन कुमार राठोड (सध्या रा.सापचुतळे,रत्नागिरी) असे सर्पदंश झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. श्ाुक्रवारी दुपारी त्याचे आई-वडील खानवली येथील रस्त्याचे काम करत असताना त्यांनी पवनला तेथील एका झाडाखाली झोपवले होते. त्यावेळी पवनला सर्पदंश झाल्याने तो रडू लागला. त्याच्या आई-वडिलांनी त्याला प्रथम खासगी रुग्णालयात नेउन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत