झाडगाव येथील सानेवरून श्री भैरीबुवा निघाले रंगपंचमी खेळायला 

रत्नागिरी : फाल्गुन पौर्णिमेला आपल्या राजवाड्यातून अर्थात मंदिरातून बाहेर पडून ग्राम प्रदक्षिणेला निघालेल्या रत्नागिरीच्या बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्री देव भैरी बुवांचा शिमगोत्सव आज रात्री १२ वाजता समाप्त होणार

दुपारी ठीक १ वाजता पोलिसांची मानवंदना घेऊन श्री देव भैरी बुवा आई जुगाई देवीच्या मंदिरात पोहोचले. तिची भेट घेऊन पुढल्या वर्षी परतभेटीला येतो सांगून तिची समजूत काढत देव गावात रंगपंचमी खेळायला बाहेर पडले.

ठरलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाला भेट देऊन तिथून लोकांची भेट घेत आता देव रात्री १२ वाजता मंदिरात पोहोचतील. तिथे गावाचे गाऱ्हाने घालून श्री देव भैरी बुवांच्या शिमगोत्सवाची सांगता होईल.