वार्ताहर | पाली : तालुक्यातील चांदेराई उमरे येथे एका अनोळखी तरुणाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे; मात्र मृतदेह नग्न आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
याबाबत पाली पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी की, २२ मार्च रोजी रत्नागिरी ते देवधे व्हाया चांदेराई जाणाऱ्या रस्त्यावरील उमरे क्रेशरजवळ एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत, नाव गाव माहिती नाही. त्याचे वर्णन एक अनोळखी पुरुष जातीचे, वय सुमारे ३५ वर्षे, रंग- गोरा, केस काळे, चेहरा गोल, उजवे हाताचे दंडावर विनोद मस्सकोल्हे असे मराठीत गोंदलेले असुन त्याखाली लव्ह चिन्ह गोंदलेले आहे. उंची ५ फुट ५ ईंच, नेसणीस काही नाही (पुर्ण नग्न) साधारण वेडसर. या घटनेची खबर रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिनेश रत्ना कांबळे पोलीस पाटील उमरे, रा.उमरे बौद्धवाडी, यांनी दिली असून घटनेची नोंद करण्यात आली आहे. तरी या अनोळखी मृतदेहाचे बाबत कोणाला माहिती असल्यास पाली पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे मो. नं.८९७५७३५८८० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











