खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील मोरवंडे पिंपळवाडी येथील ७० वर्षीय
वसंत बाबू घाडगे हा वृद्ध बेपत्ता झाला असल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात करण्यात आली आहे
श्रीमती लक्ष्मी घाडगे यांच्या खाणावळ येथे चहा-पाणी घेवुन ते रात्रीच्या जेवणाचा डबा घेवुन त्याचे राहते घरी निघुन गेला तसेच दुस-या दिवशी तक्रारदार यांचेकडे जेवणासाठी आले नाहीत म्हणुन खबर देणार हे त्याचे घरी जावुन पाहीले असता खबर देणार यांना दिसले नाही. तसेच त्याचे घराचे बाहेरील दरवाजाला लॉक होते म्हणुन खबर देणार यांनी त्याच्या गावात तसेच आजुबाजुच्या परीसरात शोध घेवून नातेवाईक मित्र मंडळी यांना फोन करुन खात्री करुन ते अद्याप पर्यत मिळुन आलेला नाही. म्हणुन यातील खबर देणार यानी दिले खबरी नुसार वरील प्रमाणे नापत्ता दाखल करण्यात आलेला आहे.











