माखजन |वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाची त्रिवार्षिक निवडणूक नुकतीच झाली.डॉ.दत्तात्रय रामकृष्ण बापट यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.तर शशिकांत विश्राम घाणेकर यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.तर सचिव पदी सुभाष सहस्त्रबुद्धे,व खजिनदार म्हणून हनीफ म्हाते यांची निवड झाली.
तर निवडणुकीत निवडून आलेले मनोज शिंदे,किशोर साठे,संजय सहस्त्रबुद्धे,दीपक शिगवण,दीपक पोंक्षे,आनंद साठे,राजेश फणसे आदींचा कार्यकारी मंडळात समावेश आहे.
डॉ.दत्तात्रय बापट यांनी या पूर्वी ९ वर्षे या संस्थेचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले आहे.त्यांच्या कार्यकाळात इंग्लिश मिडीयम स्कूल ची सुरवात झाली.तर शाळेचा शतक महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा झाला.
नूतन कार्यकारी मंडळाचा १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२७ असा कार्यकाळ असणार आहे.त्यांच्या निवडीबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












