राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत ओटवणे नंबर ३ च्या विद्यार्थ्यांचे बीडीएस परीक्षेत यश.

 

ओटवणे(प्रतिनीधी)     सावंतवाडी येथे झालेल्या बीडीएस परीक्षेत प्राथमिक ओटवणे नंबर ३ गवळीवाडी या शाळेतील इयत्ता दुसरीतील विद्यार्थी वर्धन दशरथ शृंगारे यांनी 92 टक्के गुणांसह सिल्व्हर मेडल मिळवून राज्यस्तरीय यादीत येण्याचा मान मिळवला तर याच परीक्षेत शाळेतील तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी रुंजी रघुनाथ कोटकर हिने 91 टक्के गुण मिळवत सिल्वर मेडल मिळवून राज्यस्तरीय यादीत येण्याचा मान मिळविला तर तीसरितील समर्थ समित बुराण याने प्रथम श्रेणी मिळविली.या यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सारिका दशरथ शृंगारे,सर्व सदस्य केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक ,शिक्षक, पालक, विद्यार्थी व गवळीवाडीतील सर्व पालक वर्ग यांच्यातर्फे कुमार वर्धन , कुमारी रुंजी , समर्थ या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

नुकताच नवोदय विद्यालयाचा इयत्ता सहावी प्रवेशासंदर्भात निकाल ही जाहीर झाला यात कुमारी भक्ती संतोष चिले हिने घवघवीत यश प्राप्त करत नवोद्यालय मध्ये प्रवेश मिळविला.या शाळेने आतापर्यंत अनेक गुणवंत विद्यार्थी घडवत विद्यार्थ्यांचा शैक्षणीक पाया मजबूत करण्यात मोलाचा वाटा उचलला.आज या प्राथमिक शाळेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून शाळेच्या लौकिकास हातभार लावत आहेत.तीच परंपरा शाळेने राखली आणि विद्यार्थ्यांनी . भक्ती चिले, वर्धन शृंगारे व कुमारी रुंजी कोटकर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल व शाळेचा लौकिक वाढविल्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन तसेच शुभेच्छा देण्यात येत आहेत. या विध्यार्थ्यांना एस.एस .वैज मॅडम आणि एस. यू. चव्हाण मॅडम या शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.