जागतिक स्वमग्नता जागरूकता दिवसाच्या निमित्ताने आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरी व परकार हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलताना मा.डॉ.ए.डी.परकार यांनी स्वमग्नता अर्थात ऑटिझम असलेल्या मुलांची वैशिष्ट्ये सांगताना सांगितले की, सामान्य माणसाला एखादे काम करताना एकाग्रता प्रयत्नपूर्वक आणावी लागते याउलट स्वमग्न मुलांची एकाग्रता कमालीची असते त्यामुळे ते एखादे काम खुप उत्कृष्टरित्या करू शकतात. त्यांच्यातील गुण आपणाला ओळखता आले पाहिजे व या मुलांना “स्पेशल मुले” असे संबोधले गेले पाहिजे,त्यांचा स्वीकार समाजाने केला पाहिजे.
या ऑटीझम जागरूकता कार्यक्रमाची प्रस्तावना आस्थाच्या सचिव श्रीम. सुरेखा पाथरे यांनी केली. त्यानंतर ऑटिझमच्या लक्षणांची माहिती देणाऱ्या फलकाचे उदघाट्न मा.डॉ. ए. डी.परकार यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाला रुग्णांचे नातेवाईक,परकार नर्सिंग ए.एन.एम.,जी.एन.एम चे विध्यार्थी, प्राध्यापक, परकारच्या डॉ. अनुराधा लेले, आस्थाचे श्री.संकेत चाळके, आल्हाद पाथरे आणि कायकर्ते उपस्थित होते.*











