तालुकास्तरीय (शाळा) गट आणि खुला गट अशा दोन गटात स्पर्धा होणार
देवरूख (प्रतिनिधी)महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट देवरूख यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी देवरूख येथे समुह नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा माटे-भोजने सभागृहात रात्री ८ वा. पार पडणार आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा संपन्न होत आली आहे. स्पर्धा इतकी निकोप असते की या स्पर्धेत तालुक्यातील दुर्गम भागातील शाळा सुद्धा आवडीने सहभागी होतात.
पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना पहिल्या शाळा स्तरीय गटात सहभागी होता येईल तर खुल्या गटात वयाची अट नाही. त्याचबरोबर नृत्यासाठी निवड केलेली गाणी हिंदी, मराठी आणि मुख्य म्हणजे श्रीकृष्ण चरित्रावर आधारित असावी. हे गाणे पुरक पद्धतीने संग्रहीत करुन ठेवावे. कार्यक्रम स्थळी गाणे सुव्यवस्थित सुरू न झाल्यास आयोजक जबाबदार राहणार नाही अशी अगाऊ सुचना देण्यात आली आहे. तसेच समुह नृत्य स्पर्धेतील सहभागी विद्यार्थी संख्या ५ पेक्षा अधिक नसावी त्यांच्या नावाची यादी मुख्याध्यापक अथवा समुह प्रमुख यांच्या स्वाक्षरीने दिनांक १३ ऑगस्ट पुर्वी जमा करून नोंदणी करावी. असे सुचित करण्यात आले आहे.
स्पर्धेतील सादरीकरणाचे अनुक्रमांक दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता जाहीर केले जातील. पहिल्या दहा अनुक्रमांक असलेल्या नृत्य समुहाची ७.३० वाजता उपस्थिती अनिवार्य आहे. एकाच सादरीकरणात सहभाग ग्राह्य धरला जाईल. एकाहून अधिक समुहात नृत्य करताना आढळून आल्यास तो नृत्य समूह स्पर्धेत सहभागी केला जाणार नाही. पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना वगळता स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व समुहांना स्पर्धा सहभाग पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत शाळा स्तरीय गटात आणि खुल्या गटातील प्रथम क्रमांकास रुपये ३०००/- द्वितीय क्रमांकास २०००/- तृतीय क्रमांकास १५००/- चतुर्थ क्रमांकास १३००/- पाचव्या क्रमांकास १२००/- रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. श्री संतोष केदारी शिवानी डेव्हलपर हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. कार्यक्रम दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रौ ठीक ८.०० वाजता महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे शंकरशेट माटे आणि चंद्रकांत भोजने व लक्ष्मीबाई खेतल सभागृह देवरूख येथे आयोजित करण्यात आला आहे. नोंदणी आणि स्पर्धेबाबत इतर माहितीसाठी श्री. बबन बांडागळे*
९३०९१ ४६१२३, *श्री. संजय बांडागळे, *९४२०९ ०७४४२, *श्री. दिलीप महाडिक, *७८८७४९७१०४
श्री.रविंद्र बांडागळे, *९४२०८ ४३२११ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच इच्छुक स्पर्धकांनी आपल्या नृत्य समुहाची नोंदणी त्वरित करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. ट्रस्टचे कार्याध्यक्ष चंद्रकांत भोजने (स्थानिक), कार्याध्यक्ष श्री. विक्रांत भोजने (मुंबई), चिटणीस श्री. मुकूंद वाजे (स्थानिक), विश्वस्त अविनाश कांबळे (मुंबई) यांनी या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.










